जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार
जपानचे माजी पंतप्रधान Shinzo Abe यांच्यावर भाषण देत असताना गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो एबे यांच्यावर जपानमधील नारा शहरात गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो एबे यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याची माहिती जपानस्थित NHK या मीडिया रिपोर्टमधून देण्यात आली आहे.
शिंजो एबे हे शुक्रवारी पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत होते. यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यामुळे शिंजो एबे जागेवरच कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांमधून आली आहे. तर शिंजो एबे यांच्यावर गोळी झाडण्यात आल्यानंतर ते जागेवरच कोसळले. मात्र मीडियाच्या प्राथमिक माहितीनुसार ते जखमी झाले आहेत.
NHK या मीडिया रिपोर्टनुसार शिंजो एबे यांचे भाषण सुरू असताना अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर शिंजो एबे जागेवर कोसळले. त्यानंतर त्यांचा रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कोण आहेत शिंजो आबे?
शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यांनी 1993 ते 2006 या काळात हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्ह चे सदस्यत्व भुषवले. तर पुढे लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि 2006 ते 007 या काळात जपानचे पंतप्रधानपद भुषवले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना पुन्हा बहुमत मिळाले. त्यावेळी शिंजो अबे जपानचे पंतप्रधान बनले. तर त्यानंतर सलग 8 वर्षे पंतप्रधान पद भुषवणारे ते जपानमधील पहिले व्यक्ती होते. मात्र 2020 मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानपदी योशिहिदा सुगा यांची निवड करण्यात आली.
भारत सरकारने 2021 मध्ये शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.