रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या विक्रीवर बंदी, उच्च न्यायालयाचा आदेश
उच्च न्यायालयाची रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या विक्रीवर बंदी;
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या विक्री आणि वितरणावर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बंदी घातली आहे. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी रेमंड लिमिटेडच्या अवमान याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज या प्रकरणावर अंतरीम आदेश पारीत केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे विजयपत सिंघानिया यांचे चिरंजीव गौतम सिंघानिया हे रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. 2015 मध्ये गौतम सिंघानिया आणि वडील विजय सिंघानिया यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरुन मोठा वाद झाला होता.
या संदर्भात न्यायालयीन घडामोडींचं वृत्तांकन करणाऱ्या livelaw.in ने दिलेल्या वृत्तानुसार
याचिकाकर्त्याने संविधानाच्या अनुच्छेद 226, 227 नुसार दाखल केलेल्या याचिकेमध्ये सिंघानिया, मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅमेझॉन इंडियन लिमिटेड यांनी मनाई असतानाही हे पुस्तक 1 नोव्हेंबर ला प्रकाशीत केले असल्याचं म्हटलं आहे.
या याचिकेवरील सुनावाई दरम्यान न्यायमुर्ती तावडे यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की...
"प्रतिवादी क्रमांक 3 ची मनाई असतानाही आत्मचरित्र प्रकाशित केल्याचं दिसून येते. पुस्तकाची डिजिटल आणि हार्ड कॉपी अॅमेझॉनवर विकली जात आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची गरज आहे.'
याचिकेनुसार, आत्मचरित्र कंपनीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते, समूहाची बदनामी करते आणि तसंच व्यवसायीक कामकाज आणि इतर गोपनीय बाबींवर प्रकाश टाकते.
कंपनीने आरोप केला आहे की, या पुस्तकात याचिकाकर्ते (रेमंड) चेअरमन गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांच्यातील गोपनीय लवादाच्या कार्यवाही संदर्भात आणि इतर सुरु असलेल्या कायदेशीर कार्यवाहीबद्दल माहिती आणि तपशील या आत्मचरित्रात देण्यात आला आहे.
न्यायालयाने सांगितले की, सप्टेंबर 2018 मध्ये रेमंडने सिंघानिया आणि तत्कालीन प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस यांच्याविरुद्ध ठाणे न्यायालयात खटला दाखल केला होता. या दाव्यात सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष एमेरिटस डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या विक्री आणि वितरणावर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बंदी घातली आहे. त्यामुळं प्रकाशक आता पुढची काय भूमिका घेतात. हे पाहणं महत्त्वाचं आहे.