कंगना रणौत ला मोठा झटका
वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. संगीतकर जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.;
१९ जुलै २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीमधे जावेद अख्तर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. दिवाणी न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी कंगना राणौतने हायकोर्टात केली होती. वकिल जय भारद्वाज यांनी या मागणीला विरोध करत कंगना पोलिस चौकशीत हजर राहीलेली नाही. त्यामुळे पोलिस तपास एकांकी झाला हे म्हणने म्हणजे सुनावणीला विलंब करण्याचा प्रयत्न आहे असा प्रतिवाद केला.
दिवाणी न्यायालयाने यापूर्वीच अनेकदा कंगणा रणौतला हजर होण्याचे आदेश दिले होते. तसेच हजर राहीला नाहीतर अटक वॉरंट काढू असेही सांगितले होते. हायकोर्टाच्या आदेशामुळे कंगणा रणौत पुन्हा अडचणीत सापडली आहे.