चांदवडला पारंपारिक वेशभूषेत वाद्यांच्या गजरात चिमुकल्यांचे बोहडा नृत्य

चांदवड शहरात चुमकल्यांचं बोहाडा नृत्य चांगलचं रंगल असून यात लहान लहान मुलांची वेगवेगळ्या वेश भूषेत देव देवतांची सोंग नाचवली. यात रावणाचे नृत्य करत दोन तास एक चुमकला नाचत होता. या चिमूकल्यांनी बोहडा नृत्य करत पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवले.

Update: 2024-01-18 07:12 GMT

चांदवड शहरात चिमूकल्यांचं बोहाडा नृत्य चांगलचं रंगल असून यात लहान लहान मुलांची वेगवेगळ्या वेश भूषेत देव देवतांची सोंग नाचवली. यात रावणाचे नृत्य करत दोन तास एक मकला नाचत होता. या चिमूकल्यांनी बोहडा नृत्य करत पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवले.

मुखवटा नृत्ये. जगभरात धर्मधारणांसह सर्वदूर मुखवटा नृत्य उत्सव सादर होतो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात ‘बोहाडा’ नावाने मुखवट्यांचा किंवा स्वांगांचा (सोंगाचा) उत्सव होतो. विशेषतः ठाणे, नगर व नासिक जिल्ह्यात साधारण चैत्र-वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात येतो. तीन, पाच, किंवा सात दिवस चालणार्‍या या उत्सवास ‘आखाडा’ किंवा ‘आखाडी’ असेही नाव आहे. हा उत्सव देवीची यात्रा म्हणूनही साजरा केला जातो. या उत्सवात देव, देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापदे, ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगे घेतली जातात. मुखवटे व त्यांबरोबरच प्रभावळी बांधून ही सोंगे नाचत मंडपात, दरबारात येऊन सूत्रधार, गाडीवान यांच्या सहकार्याने पुराणकथा सादर करतात. या उत्सवांत सामान्यतः उत्सव सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंगे नाचविण्याची प्रथा आहे. या उत्सवास भवाडा, लळीत असेही म्हणतात. देवीच्या आवाहनापासून सांगतेपर्यंत पूजाअर्चा, वारी घेणे (अंगात संचार होणे) यांबरोबरच विधिनाट्यात्मधारणेसह लोकनाट्य तमाशा सादर करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी गोंधळीसमूहांची हजेरी असते. ‘रात्र थोडी सोंगे फार’ ही म्हण या उत्सवातूनच आकारली जाते. भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या दाक्षिणात्य भागांत यक्षगान स्वरूपात, तसेच श्वापदे, देवीदेवता यांच्या मुखवट्यांसह हा उत्सव होतो. दादरा नगर हवेली, सिक्कीम, आसाम, नागालँड, मिझोराम, हिमाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा अशा आदिवासीबहुल पूर्वांचलात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

पारंपारिक संस्कृतीचे घडवले दर्शन

नाशिकच्या चांदवड शहरात चिमूकल्यांचं बोहाडा नृत्य चांगलाच रंगला असून यात लहान लहान मुलांची वेगवेगळ्या वेश भूषेत देव देवतांची सोंग नाचवली. यात रावणाचे नृत्य दोन तास एक चिमुकला नाचत होता. या चिमूकल्यानी बोहडा नृत्य करत पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवले. रावण, शंकर पार्वती, गणपती यांचे पारंपारिक सोंग घेत केले नृत्य सादर केले. एका चिमुकलीने बेटी बचाव बेटी पढाव असे आपल्या पेहरावावर लिहिले असल्याने बोहाड नृत्य पहाण्यसाठी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्याच निदर्शनास आले. उपस्थितांनी बोहाड नृत्याचा मनोमन आनंद घेतला आहे.

Tags:    

Similar News