व्हिडीओ: अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं न मिळाल्यामुळे मृतदेह गंगेत सोडले
गंगा नदीत 40 मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत.;
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात गंगा नदीत 40 मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता असल्याने नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडल्याचा बोलले जात आहे.
मात्र बीबीसीने दिलेली वृत्तानुसार प्रशाससनाने हा दावा फेटाळला आहे. तर यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रीय जनता दलचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ह्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच,त्यांनी म्हंटलं आहे की, व्हिडीओ पाहून परिस्थिती भीषणता लक्षात येऊ शकते.
मात्र बिहार सरकार खरी परिस्थिती स्वीकारायला तयार नाही.दोन तोंडी इंजन असलेलं सरकार अपयशी ठरत असून, आता रुग्णालयाच नाही तर स्मशान भूमीत सुद्धा जागा पुरत नसल्याने लोकं मृतदेह नदीत फेकून देत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.