शैक्षणिक वर्ष लांबणार, बारावी आणि दहावीच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये
राज्यातील शाळा कधी सुरू होणार आणि कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची महत्त्वाची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.;
कोरोनामुळे सध्या राज्यातील शाळा कॉलेजेस सध्या बंद आहेत. त्यामुळे यंदा इयत्ता बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वीची परीक्षा 1 मे नंतर घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचारही सुरू आहे आणि याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
सरकारने ९ वी ते १२चे वर्ग सुरू केले असले तरी बहुतेक ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. दरम्यान आता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि दहावीची परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार असल्याने शैक्षणिक वर्ष लांबवण्याची शक्यता आहे.