कोरोना रुग्णाला अव्वाच्या सव्वा बिल, मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिले लावली जात असल्याचे धक्कादायक प्रकार अनेक ठिकाणी उघड झालेले आहेत. पण आता सरकारने इशारा दिल्याप्रमाणे अशा हॉस्पिटलवर कारवाईला सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
एका कोरोनाबाधित रुग्णाच्या उपचाराचे अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यात आल्याचं महापालिकेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेने ही तक्रार दाखल केलेली आहे. दरम्यान नानावटी हॉस्पिटलने या संपूर्ण प्रकरणात महापालिकेला आणि पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सांगितले आहे.
हे ही वाचा..
- कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा आज एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे
- दुर्लक्षित विदर्भातील संत्रा!
- बोगस बियाण्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट
हॉस्पिटल प्रशासन सध्या या तक्रारीच्या अर्जाची वाट पाहत आहे. त्याची प्रत मिळताच नेमकी काय तक्रार करण्यात आलेले आहे याची माहिती घेतली जाईल, असेही हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान नानावटी हॉस्पिटलतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात हॉस्पिटलने आतापर्यंत अकराशे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून या लढाईमध्ये पुढाकार घेतल्याचा दावा केलेला आहे.