मुंबई महापालिकेचे बजेट आज सादर होत आहे. त्याआधी शिक्षण समितीसमोर सहआयुक्त रमेश पवार यांनी बजेट सार केले. शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासनाने शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोषी यांना सादर केला. त्यानंतर बजेट वाचण्याआधी शिक्षण समितीचे सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. पण हा प्रकार तातडीने लक्षात येताच ते उठून गेले. त्यानंतर काही क्षणातच त्यांनी कामाला सुरूवात केली आणि बजेट सादर केले.