भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्र्यांचे मनसेच्या आमदारांकडून स्वागत

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा डोंबिवलीमध्ये दाखल झाली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले.;

Update: 2021-08-17 02:19 GMT

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा डोंबिवलीमध्ये दाखल झाली त्यानंतर जागोजागी भाजप कार्यकर्त्यानी स्वागत केले. पलावा येथे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले , त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी देखील केंद्रीय मंत्री पाटील यांचं स्वागत केले. मानपाडेश्वर मंदिरात संघर्ष समिती तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

मात्र, यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केल्याने कपिल पाटील यांचे स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. याबाबत आमदार पाटील यांना विचारलं असता त्यांनी यात राजकारण नाही मी जिल्हा परिषद सदस्य असताना ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांची कार्यशैली चांगली आहे , ते पक्ष विरहित काम करतात आज त्यांची जन आशीर्वाद यात्रा माझ्या घरासमोरून जात होती , म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आलो होतो अस सांगत यात काही राजकारण नसल्याचं सांगितले आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News