केसीआर यांच्या भेटीवरून काँग्रेसची टिका, काँग्रेस वगळून भाजपचा पराभव अशक्य

काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. त्यामुळे काँग्रेस वगळून भाजपचा पराभव अशक्य आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.;

Update: 2022-02-20 14:37 GMT

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत मोदी विरोधकांची मोट बांधणार असल्याचे म्हटले. त्यावरून काँग्रेस वगळता मोदी सरकारचा पराभव अशक्य असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकुर यांनी केली आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला तोंड पाडले. त्यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी सांगितले की, काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे, असे मत व्यक्त करत केसीआर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर टीका केली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार विरोधात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधणार असल्याचे मत व्यक्त केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले की, समविचारी पक्षांचा देशव्यापी अजेंडा तयार करण्यासाठी बारामती येथे बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच बेरोजगारी, गरीबीविरोधात लढण्यासाठी रणनिती ठरवणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

तसेच चंद्रशेखर राव यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला बाहेर ठेऊन तिसरी आघाडी करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना चंद्रशेखर राव म्हणाले की, आज आमच्या दोघांच्या चर्चेने सुरूवात झाली आहे. मात्र पुढील भविष्यवाणी आताच करणार नाही. तर देशातील इतर नेत्यांशी चर्चा करून त्यानंतर आमचा निर्णय तुमच्यासमोर ठेऊ, असे सांगत काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न होण्याच्या शक्यतेला वाव ठेवला आहे. त्यावर मंत्री यशोमती ठाकुर यांनी काँग्रेस वगळून मोदींविरोधातील लढाई यशस्वी होणार नाही, असे म्हणत केसीआर भेटीवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News