धार्मिक तेढ निर्माण करून निवडणूका जिंकायचं हे भाजपचं षडयंत्र - संजय राऊत
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मणिपूर, अयोध्येतील राम मंदिर यावर वक्तव्य केलं आहे. मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी शौर्यावर बोलून नये अशी भाजपवर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.;
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मणिपूर, अयोध्येतील राम मंदिर यावर वक्तव्य केलं आहे. मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी शौर्यावर बोलून नये अशी भाजपवर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यानं खासदार संजय राऊत म्हणाले की "राम मंदिर हा विषय फडणवीस यांना महाराष्ट्रात शिवसेनेला लक्ष करण्याचा विषय वाटत असेल, तर फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा, फडणवीसांनी स्वतःची खुर्ची सांभाळावी. त्यांना अर्धवट उपमुख्यमंत्री बनवल आहे, त्याकडे त्यांनी पहावं. या महाराष्ट्रात एक फुल मुख्यमंत्री आणि दोन डाऊट फुल मुख्यमंत्री आहेत त्यावर बोलावं. राम मंदिर संदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे? हे जगातला प्रत्येक व्यक्ती जाणतो. तेव्हा फडणवीस गोधडीत रांगत होते. अशी टीका संजय राऊत यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले की धार्मिक तेढ निर्माण करून निवडणूका जिंकायचं हे भाजपचं षडयंत्र मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी या पळकुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानावर प्रश्न विचारू नये असं देखील संजय राऊत म्हणाले