पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला!
पुण्यात धक्कादायक घटना घडली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेमुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शुक्रवारी (दि. ९ फेब्रुवारी) पुण्यात धक्कादायक घटना घडली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेमुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुण्यातील काही संघटनाच्या वतीने शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात "निर्भय बनो" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला निखिल वागळे हे उपस्थित राहणार होते आशात या कार्यक्रमाचा विरोध करत काही भाजप कार्यकर्ते सभागृहात घुसून दगडफेक आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला असल्याच पुढे आले आहे. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले. पण भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने करत निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली.
या हल्ल्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा निषेध करत राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालया बाहेर आंदोलन पुकारले आहे. हल्लेखोरांनी वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा आरोप सुद्धा होत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी निखिल वागळे पोहचताच "भारतात लोकशाही राहिलेली नाही" असा गंभीर आरोप केला आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत असतांना पालकमंत्री अजित पवार यांनी हल्ल्याची निंदा करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. निखिल वागळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.