शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही : राज्यपाल सत्यपाल मलिक
`` सध्या उत्तर प्रदेशातील अनेक भागात भाजप नेत्यांना जाणं मुश्किल झालं आहे. आगामी काळात शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, अशा शब्दात भाजपचे वरीष्ठ नेते आणि मिझोरामचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.
सध्या उत्तप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींचे पडघम वाजत आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील जाट समाजातील शेतकरी नेते असलेले सत्यपाल मलिक म्हणाले, ``मी उत्तर प्रदेशच्या मीरत भागातून येतो. मीरत, मुझ्झफरनगर आणि बागपत भागातील कोणत्याच गावात भाजपचे नेते सध्या जाऊ शकत नाहीत.
मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी शेतकऱ्यांसाठी मी पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतरांशी भांडलो आहे. शेतकऱ्यांसोबत तुम्ही चुकीचं करत आहात , हे करु नका. हे माझं सर्वांना सांगून झालं आहे``.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी हमीभावाची (MSP)ची आहे. सुप्रिम कोर्टानं तसेही तीन कृषी कायदे स्थगित केले आहेत. हमीभावाशिवाय शेतकऱ्यांना शांत करता येणार नाही. पंतप्रधानांना याबाबत सार्वजनिकरित्या निरोप देणं योग्य ठरणार नाही. परंतू मी स्वतः वैयक्तिकरित्या या शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवील असं, सत्यपाल मलिक म्हणाले.
विशेषतः शिख समुदायांशी पंगा घेणं बरोबर नाही . याच शिखगुरुंनी शस्त्रशिवाय मुघल साम्राज्याविरोधात लढा दिला होता, हे लक्षात ठेवले पाहीजे.
सरकारने सांगितले तर मी सरकार आणि शेतकरी संघटनामधे मध्यस्थ होण्यास तयार आहे, पंरतू शेतकरी समाधानासाठी हमी भाव (MSP) महत्वाचा आहे, हमीभावाशिवाय शेतकरी रसातळाला जाईल, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
जम्मु कश्मिरचे माजी राज्यपाल असलेले मलिक यांनी सध्याच्या कश्मिरमधील अस्वस्थेबद्दलही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पूर्वी दहतवादी श्रीनगरच्या ५० किलोमीटर परीसरात प्रवेश करायला धजावत नव्हते. मात्र आता दशहतवादी खुलेआम लोकांना मारत आहेत असं सांगितलं.
नुकत्याच झालेल्या लखीमपुर खेरीमधे शेतकरी हत्याकांडाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहीजे का? या प्रश्नावर सत्यपाल मलिक म्हणाले, मंत्र्याचा राजीनामा घटना घडल्यानंतर तातडीने झाला पाहीजे होता. हे मंत्री ( अजय मिश्रा) मंत्री पदाला पात्र ठरत नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.