छगन भूजबळ यांना चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही जामीनवर आहात असा इशारा दिल्यानंतर भाजप ओबीसी नेत्यांना टार्गेट करतंय का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता, भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून ओबीसी नेत्यांना न्याय दिला आहे. अलिकडच्या कालखंडामध्ये या 5 ते 7 वर्षात चित्र बदलंल दिसतंय. आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय.
आण्णा डांगे, चंद्रशेखर बावनकुळे, भाऊसाहेब फुंडकर, गोपिनाथ मुंडे यांच्यावर अन्याय केला. भाजपने गोपीनाथ मुंडेंचा सर्वाधिक छळ केला. त्यानंतर मलाही वेगवेगळ्या कारणांनी त्रास देण्याचं काम भाजपने केला असल्याचा दावा खडसेंनी केला आहे.