आंबेडकर चौकातील पेट्रोल पंप रद्द करण्याच्या आंबेडकरी जनतेच्या मागणीस भाजपचा पाठिंबा

आंबेडकर चौकातील पेट्रोल पंप रद्द करण्याच्या आंबेडकरी जनतेच्या मागणीस भाजपचा पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली;

Update: 2021-08-22 12:04 GMT

खासदार रामदास तडस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पेट्रोल पंपाला होत असलेल्या विरोधाबाबत सुरू असलेल्या आंदोलनला पाठिंबा दर्शवत पत्रकार परिषद घेतली, पेट्रोल पंपाला विरोध नाही मात्र या जागेला विरोध असल्याचं खासदारांनी सांगितले. या पेट्रोल पंपाची जागा बदलवण्यात यावी आणि जर समनव्यातुन प्रश्न सुटणार असेल तर आंदोलनाची गरज पडणार नाही असे मत उपस्थित पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे,भाजपचे खासदार रामदास तडस यांच्यासह आमदार पंकज भोयर,नगर परिषदेचे प्रदीपसिंह ठाकूर,मिलिंद भेंडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरून पाठक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Tags:    

Similar News