पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपाने दिले पोलीस आयुक्तांना निवेदन

Update: 2021-10-27 16:56 GMT

औरंगाबाद शहरातील गुंठेवारी जमीन प्रकरणात औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना निवेदन दिले आहे.

गुंठेवारी वसाहतींमध्ये नियमितीकरणाच्या नावाखाली महापालिकेने महावसुली अभियान सुरू केल्याचे म्हणत गुंठेवारी वसाहतींना स्लम घोषित करावे, गुंठेवारीतील करांचा ५० टक्के वाटा शासनाने उचलावा अशी मागणी याआधीच भाजपने केली आहे.

मात्र, शासन प्रशासनाकडून येथील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, घरांवर आणि दुकानांवर बुलडोझर चालवू असा आरोप केणेकर यांनी केला. दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांची दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे . सुमारे १२० वसाहतींमध्ये मजूर, कामगार, नागरिक राहतात. मात्र हेच गोरगरीब नागरिक सध्या धास्तावले आहेत.

भाजपने दिलेल्या निवेदनात पालकमंत्री यांची आणि खासगी कंपनीतील कर्मचारी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

20 वर्षांपूर्वी यांच्याच लोकांनी गुंठेवारीतील नागरिकांना जमिनी विकल्या मात्र, आता त्यांची घरे पडण्याच्या धमक्या यांचीच लोकं देत आहेत असा आरोप भाजपने केला सोबतच महापालिका म्हणजे यांचा मॉल झाला आहे असा घणाघात करण्यात आला. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री यांच्यावरही भाजपने गंभीर आरोप करत , गुंठेवारी प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Tags:    

Similar News