पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार, भाजप खासदारांचा आरोप

प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा भाजप खासदार सुजय विखे यांनी केला आहे.;

Update: 2022-02-16 02:26 GMT

राज्यात भाजपकडून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरले जात असताना भाजप खासदार सुजय विखे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप अहमदनगर येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सुजय विखे यांनी आरोप केला.

प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेच्या शहरी विभागात 70 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला. तर यावेळी विखे म्हणाले की, मी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केंद्र सरकारने शहरी भागाला 100 कोटी रुपये निधी वितरीत केले असल्याची माहिती दिली. त्यानंतर मी राज्य सरकारच्या म्हाडाकडे याबाबत विचारणा केली. तर त्यांनी 40 कोटी रुपये वितरीत केले असल्याची माहिती दिली. मात्र अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 30 कोटी रुपयेच मिळाले असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला मिळालेल्या 70 कोटी रुपयांचे काय झाले? असा प्रश्न विचारला. पण अधिकारी या प्रश्नाचे उत्तर देत नसल्याने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत 70 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विखे यांनी केला.

पुढे विखे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामिण भागातही घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी नागरीकांनी उपोषण केले. त्यावेळी केंद्र सरकारचा हिस्सा मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला निधी सहकारी बँकांनी कर्जापोटी जमा करून घेतला. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.

यासह दिशा समितीच्या सभेत अधिकारी जलजीवन मिशनबाबत काहीही माहिती देत नाहीत. जिल्ह्यासाठीचा आराखडा काय ? याची अधिकाऱ्यांना माहिती नाही. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला प्रचंड निधी मिळत असताना त्याची माहिती नाही, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

Tags:    

Similar News