कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने खासदार निधीवर निर्बंध आणले आहेत. पण याच मुद्द्यावरुन भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने कोरोना काळात चांगले काम केले आहे. पण खासदार निधीवर निर्बंध आल्यानं अनेक स्थानिक विकासकामे रखडली आहेत. राज्यातील सर्वच खासदारांना याचा फटका बसला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार काही विकाससकामे रद्द करत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे केंद्र सरकारने खासदारांना स्थानिक विकास निधी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. कोरोना काळात सरकारने चांगले काम केले पण ता मदारारांपुढे जाताना विकासकामे केल्याचे सांगता यावे यासाठी तरी सरकारने निधी द्यावा अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही खासदार निधीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. केंद्राने खासदारांचा निधी रोखला आहे. पण महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पक्षीय भेद न करता सर्व आमदारांना अतिरिक्त निधी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता.