BJP खासदार प्रज्ञा सिंह यांनी The Kerla Story चित्रपट दाखवला ती तरूणी पळून गेली
भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका 19 वर्षीय तरूणीला द केरल स्टोरी हा चित्रपट दाखवला. मात्र, ही तरूणी तिच्या युसूफ नावाच्या प्रियकरासोबत स्वतःच्या मर्जीनं पळून गेलीय.
भाजपच्या भोपाल इथल्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका 19 वर्षीय तरूणीला द केरल स्टोरी (The Kerla Story) हा चित्रपट दाखवला होता, तीच तरूणी प्रियकर युसूफ सोबत पळून गेलीय. विशेष म्हणजे हा चित्रपट दाखविल्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी या तरूणीला प्रियकर युसूफ सोबत दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला धुडकावत या नर्सिंगची विद्यार्थींनी असलेल्या या तरूणीनं लग्नाच्या आधीच प्रियकरासोबत जाणं पसंत केलंय.
वादग्रस्त चित्रपट द केरल स्टोरी
द केरल स्टोरी हा चित्रपट केरळमधील एका हिंदू महिलेवर आधारित आहे. मुस्लिम धर्माचा स्विकार करण्यासाठी तिचा ब्रेनवॉश केला जातो. त्यानंतर तिला सीरिया इथं पाठवलं जातं. तिथं इसीसमध्ये सहभागी होण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो.
शेजारी राहणा-या प्रियकरासोबतच तरूणी पळाली
भोपाळ इथल्या नया बसेरा या परिसरात ही तरूणी राहते. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा प्रियकर युसूफ हा त्यांच्या शेजारी राहतो. लग्नाच्या आधीच तरूणी युसूफ सोबत पळून गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. या तरूणीचं 30 मे रोजी लग्न ठरलं होतं. लग्नासाठी ठेवलेले पैसे आणि दागिणे घेऊन तरूणी युसूफ सोबत पळून गेल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.
भोपाळच्या कमला नगर पोलीस ठाण्यात तरूणीच्या कुटुंबियांनी तक्रार दिलीय. त्यात त्यांनी युसूफने मुलीला गोड बोलून फसवलं आणि तिला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय. युसूफने मुलीच्या नावावर बँकेतून कर्जही घेतलं होतं, त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी युसूफ मुलीवर दबावही आणत होता, असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय.
या तरूणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केलंय की, ती युसूफ सोबत पळून गेली होती. युसूफ हा एक सराईत गुन्हेगार आहे. युसूफ विरोधात सहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कुणाच्याही दबावाशिवाय ती युसूफसोबत पळून गेली होती. दरम्यान, या घटनेनंतर भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह यांना नेटिझन्सनं ट्रोल करायला सुरूवात केलीय.