भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून कुस्तीपटूला मारहाण

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कुस्तीपटूला कानाखाली मारताना दिसत आहे.;

Update: 2021-12-18 04:31 GMT

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कुस्तीपटूला कानाखाली मारताना दिसत आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार खासदारांकडे मांडण्यासाठी हा पैलवान मंचावर गेला होता. रांची येथील शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवस खासदार ब्रिजभूषण सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 15 वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये एका कुस्तीपटूला अपात्र ठरवण्यात आले. त्याचे वय जास्त होते आणि त्याने कमी सांगितले. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा कुस्तीपटू चॅम्पियनशिपमधून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाला आणि थेट मंचावर जाऊन खासदारांना आपली व्यथा सांगितली. दरम्यान यावरून खासदारांचा पारा चढला आणि त्यांनी थेट या खेळाडूच्या कानाखाली लगावली. यानंतर या कुस्तीपटूला मंचावरून खाली उतरवण्यात आले, मात्र हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

यासंदर्भात असोसिएशनचे म्हणणे आहे की , संबंधित कुस्तीपटूने नियमांचे पालन केले नाही आणि गैरवर्तन केले त्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आले.

नियमांच्या पलीकडे कोणीही नाही. मात्र, खासदारांच्या या वागण्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावर अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथून खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह सध्या कैसरगंजचे खासदार आहेत. तसेच या प्रकरणी त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.

Tags:    

Similar News