सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला संरक्षण देत आहे का? भाजप नेते राम शिंदे यांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचं उत्तर

धरणग्रस्तांना दलालामार्फत जमिनी मंजूर केल्याच्या मुद्द्यावर राम शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत दोन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.;

Update: 2022-12-21 07:57 GMT

सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये कोयना, धोम, कन्हे अशा विविध धरणाखालील धरणग्रस्तांना दलालामार्फत जमिनी मंजूर करुन त्या जमिनींची दलाला खरेदी-विक्री केल्याप्रकरणी गैरव्यवहाराची चौकशीचा आरोप राम शिंदे यांनी केला. याबाबत मंत्री संदीपान भुमरे यांनी उत्तर दिले. मात्र हे उत्तर गोल गोल असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी सवाल केला. यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करत दोन महिन्यात या अधिकाऱ्याची चौकशी करून जो अहवाल येईल. त्यानुसार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Tags:    

Similar News