जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी पोलिसांना निलंबित करा – श्वेता महाले

Update: 2021-03-03 08:53 GMT

जळगावमधील आशादीप वसतीगृहात महिलांना नाचवल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. "हे वसतिगृह कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता, मुली यांच्यासारख्या पीडित महिलांच्या संरक्षणासाठी हे वसतिगृह चालवले जाते.

मात्र या वसतिगृहातील कर्मचारी आणि पोलीस यांच्यामार्फत पीडित महिलांना चौकशीच्या माध्यमातून कपडे काढून नृत्य करायला लावलं जातं हा प्रकार दुर्दैवी आहे गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत पोलिसांचं निलंबन करावे "अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. यावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची चौकशी समिती नेमून दोन दिवसामध्ये दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.

Tags:    

Similar News