राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राज्यभरातून अनेक मोर्चे मुंबईत धडकत असतात. मुंबईतील आझाद मैदानात अनेक संघटना आपापले प्रश्न घेऊन आंदोलन करतात. मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने या आंदोलनांची दखल घेत सरकारपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला आहे. आझाद मैदानात एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील शालेय शिक्षक संघटना आंदोलन करत आहेत. राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षकांचे इथे आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांचे मानसिक आणि आर्थिक पिळवणुक थांबेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे लिलाधर अनभुलेने...