भाजप आमदाराला अटक, मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं

Update: 2022-08-23 08:41 GMT

भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला काही काळ लोटत नाही तोच हैद्राबादमध्ये भाजप आमदाराने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदाराला अटक केली आहे.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरात भारताची नाचक्की झाली होती. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र या घटनेला काही काळ लोटत नाही तोच भाजप आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हैद्राबादमध्ये तणावाचे वातावरण निर्मआण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी भाजप आमदार टी राजा सिंह यांना अटक केली.

भाजप आमदार टी राजा सिंह यांचा एक व्हिडीओ श्रीराम चॅनल तेलंगणा या युट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आला होता. या 10 मिनिट 27 सेकंदाच्या व्हिडीओचे शीर्षक फारुखी के आँख का इतिहास सुनिए असे होते. त्या व्हिडीओत गोशामहलचे आमदार टी राजा सिंह हे स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुखीसंदर्भात बोलत होते. तर हा व्हिडीओ सोमवारी रात्री अपलोड करण्यात आला. यामध्ये त्यांनी नुपूर शर्मा यांचे नाव न घेता त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उच्चार केला. त्यामुळे हैद्राबादमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सोमवारी रात्री अनेक ठिकाणी आंदोलकांनी आमदार टी राजा यांना अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे अखेर टी राजा यांना पोलिसांनी अटक केली.

टी राजा सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. तर नुपूर शर्मा यांच्यापाठोपाठ आणखी एका भाजप नेत्याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटल्याचे दिसून आले

Tags:    

Similar News