भाजप नेते बिथरले आणि मध्यरात्री धावले :सचिन सावंत

Update: 2021-04-18 07:39 GMT


Full View

कोरोना महामारी मध्ये रेमडेसीवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्या डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध करत असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या स्वतः फडणवीस जी रात्रीसुध्दा धावले.

एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिस वर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या ६०००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे अशा शब्दात काँग्रेसचे भाजपचा निषेध केला आहे.

Tags:    

Similar News