शिवसेनेचे मुखियाही हेच धंदे करतात : किरीट सोमय्या
परदेशात असलेले शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईड़ीने छापेमारी केल्यानंतर भाजप नते किरीट सौमय्या यांनी कारवाईचे स्वागत केले आहे.;
परदेशात असलेले शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारल्यानंतर ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही, असं सांगतानाच शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. नामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.