आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे.किरीट सोमय्यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला.सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हायकोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देत तक्रार अस्पष्ट आणि प्रसापमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचं निरीक्षण नोंदवलं यावेळी कोर्टाने सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर रहावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं.५७ कोटी जमवल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही असं कोर्टाने यावेळी सांगितलं. १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी कोर्टाने दिले. तसंच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांचा मुलगा नील याचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आयएनएस विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी फेटाळला होता.
आणखी एक दिलासा घोटाळा!!!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 13, 2022
किरीट सोमय्यांना दिलासा दिल्यानंतर संजय राऊतांनी पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.आणखी एक दिलासा घोटाळा अशी पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांनी किरीट सोमय्या फरार असल्याचा आरोप केला होता.