धाडीची तयारी दोन दिवसात होत नाही हे इतकी वर्षे राजकारणात असून तुम्हाला माहिती नाही का?- चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यंत्रणेवर केलेल्या आरोपाचे मी समर्थन किंवा विरोध करणं हे माझं काम नाही. ज्या यंत्रणेवर त्यांनी आरोप केले आहे, त्यांनी ते उत्तर दिलं आहे, बाकीच्यांच्या ठिकाणी धाडी पडल्या तर चालत आणि तुमच्यावर धाडी पडल्या तर सूड उगवला अस नाही होत. धाडीची तयारी दोन दिवसात होत नाही हे इतकी वर्षे राजकारणात असून तुम्हाला माहिती नाही का? असा घणाघात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 'महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे.अध्यक्ष लवकर नेमावा , पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल' असं ट्विट केलं होतं. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच चित्रा वाघ यांच्या ट्विटवरून राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना त्यांच्या जुन्या अनुभवातून त्यांनी ही टीका केली असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. रुपालीताई चाकणकर कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असणार यामुळे त्यांनी तस ट्विट केलं असेल असं पाटील म्हणाले.
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचं स्वागत मी करेन. मराठा समाजाला नेतृत्वाची गरज आहे. सरकारचे नाक दाबले तरच तोंड उघडलं जाईल असं पाटील म्हणाले. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत पोलीस स्टेशनने फार ढकालढकल न करता रीतसर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आता तक्रार दाखल करून 15 दिवस उलटून गेले आहेत, त्यामुळे किरीट सोमय्या कधीही कोर्टात पोहचू शकतात असं पाटील म्हणाले.