'G' में दम है तो.. भाजप नेत्याचे वादग्रस्त ट्वीट

देशभरातील विविध मुद्द्यांवरून राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र अनेकदा आरोप प्रत्यारोपांमध्ये असंसदीय शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे सध्या देशात राजकारणाची पातळी खालावत असल्याचे म्हटले जाते. त्यातच भाजप प्रवक्त अवधुत वाघ यांनी भाजप संस्कृतीला साजेशे ट्वीट केले आहे.

Update: 2022-03-17 02:43 GMT

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टीका केली जाते. मात्र काही वेळा भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केले जाते. त्यामध्ये असंसदीय शब्दांचा वापर केल्याचे पहायला मिळते. त्यातच भाजप नेते अवधुत वाघ यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करताना असंसदीय शब्दांचा वापर केला आहे.

'G" में दम है तो महाराष्ट्र में काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री कर के दिखाओ... अशा असंसदीय शब्दांचा वापर करत अवधुत वाघ यांनी वापर केला आहे. त्यामुळे राज्यात ही भाजपची संस्कृती आहे का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा मांडणारा काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशात दोन मतप्रवाह तयार झाले. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स चित्रपट वादात सापडला आहे. तर हा चित्रपट राजकीय पोळी भाजण्यासाठी तयार केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र भाजपकडून हा चित्रपट सर्वांनी पहावा, असे आवाहन केले आहे. त्यापार्श्वभुमीवर गुजरातसह अनेक राज्यांनी कश्मीर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री केल्याने राज्यातही काश्मीर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची मागणी करताना असंसदीय शब्दाचा वापर केला आहे. तर यापुर्वीही अवधुत वाघ यांनी असंसदीय भाषेचा वापर करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपच्या संस्कृतीला साजेशे ट्वीट अवधुत वाघ यांनी केल्याचे समोर आले आहे.



Tags:    

Similar News