भाजपने जनतेची कमाई लुटली – मल्लिकार्जुन खरगे
केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झालीत. या नऊ वर्षांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजप सरकारने ९ वर्षात जनतेची पिळवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.;
मागील ९ वर्षात मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. मोदी सरकारने खोटी आश्वासने देत जनतेची फसवणूक केली. कॉग्रेस सरकारच्या काळात वस्तुंच्या किंमती आणि भाजप सरकारच्या काळात वाढवलेली महागाई याची तुलना मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटद्वारे दाखविली आहे. काँग्रेस काळात घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ४१० रुपयांना मिळत होता. हाच सिलेंडर आता मात्र १ हजार १०३ रुपयांना मिळतोय. काँग्रेस काळात पेट्रोल प्रतिलिटर ७१ रुपयांना मिळायचं तेच पेट्रोल आता मात्र ९७ रुपये लिटर मिळतंय.
काँग्रेसच्या सत्ताकाळात डिझेल ५७ रुपये लिटर आता ९० रुपये लिटर, तांदूळ ३६ रुपये किलो होता आता ८० रुपये किलो. जेवणासाठी वापरले जाणारे तेल तेव्हा ९० किलो आता मात्र १५० रुपये प्रतिलिटर मिळतंय. तेव्हा तूप ३०० रुपये किलो आता ७०० रु किलो, दूध ३५ रु लिटर आता ६६ रुपये लिटर, तेव्हा डाळ ८० रुपये आता १७० रुपये. भाजप सरकार महागाई वाढवून देशाचा विकास करत असल्याचा टोमणा मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.
9 सालों में जानलेवा महँगाई,
— Mallikarjun Kharge (@kharge) May 29, 2023
भाजपा ने लूटी जनता की कमाई !
हर ज़रूरी चीज़ पर GST की मार,
बिगड़ा बजट, जीना दुशवार !
अहंकारी दावे-
“महँगाई तो दिखती नहीं” या “ये महँगी चीज़ हम खाते ही नहीं”
“अच्छे दिनों” से “अमृतकाल” की यात्रा
महँगाई से जनलूट की बढ़ती गई मात्रा !#NaakamiKe9Saal pic.twitter.com/00bOLILO70