भाजपा किसान मोर्चाचे 'शेतकरी संवाद अभियान' सुरू

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली असताना सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक भूमिका घेतांना दिसत नाही म्हणून भाजप आक्रमक झाली आहे.

Update: 2021-07-29 11:54 GMT

धुळे : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने 'शेतकरी संवाद अभियान' सुरू करण्यात आले आहे. सध्या धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक भूमिका घेत नसल्याचे म्हणत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने धुळ्यामध्ये शेतकरी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकी दरम्यान राज्य सरकार शेतकऱ्यांसंदर्भात घेत असलेली दुटप्पी भूमिकेवर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या संदर्भात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळावी त्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने पुढील काही दिवसात आंदोलनाची तयारी करण्यात येत असून याबाबत रणनीती ठरवली जात असल्याचे काळे यांनी सांगितले.

ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने त्या-त्या जिल्ह्यांमध्ये दौरे करून यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने धुळे जिल्हा दौरा करण्यात आल्यानंतर या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News