शेतकऱ्यांचं भलं करण्याचा दावा करणाऱ्या मोदी यांनी शेतक-यांशी संवाद का साधला नाही? पाशा पटेलांनी प्रश्न टाळला केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी शेतक-यांनी अजूनही दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन मागे घेतलेले नाही. शेतक-यांनी आता MSP शेतकर्यांच्या मालाला जोपर्यंत हमीभाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावर आम्ही राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी बातचीत केली.
यावेळी त्यांनी तीन कृषी कायद्याचं समर्थन करत आगामी काळात शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीने शेतक-यांच्या मालाला हमीभाव दिला जाईल. असा दावा पटेल यांनी केला आहे. तसंच मोदी हेच शेतक-यांचे तारणहार आहेत. असं देखील पटेल यांनी सांगितले. मात्र मोदी जर शेतक-यांचे तारणहार आहेत. तर त्यांनी आंदोलक शेतक-यांशी का बातचीत केली नाही? असा सवाल उपस्थित केला असता, पटेल यांनी प्रश्नावर बगल देण्याच्या प्रयत्न केला.तसंच यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्याबाबत बोलताना पटेल यांची जीभ घसरली. पाहा काय म्हणाले पाशा पटेल