चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही : फडणवीस
अत्यंत नाट्यमय रित्या आज सकाळी परदेशात असलेल्या शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं म्हटलं आहे.;
अत्यंत नाट्यमय रित्या आज सकाळी परदेशात असलेल्या शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं म्हटलं आहे.
फडणवीस यांच्या पदवीधर विधानपरीषद प्रचाराच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सोलापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीची कारवाईक सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यता आलं असता ते म्हणाले की, "ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल" असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.