आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार, भाजपला मोठी आघाडी

Update: 2021-05-02 08:11 GMT

प.बंगालमध्ये भाजपच्या पदरी निराशा पड़ली आहे. पण भाजपसाठी दिलासादायक बाब म्हणजे आसाममध्ये पुन्हा कमळ फुलण्याच्या मार्गावर आहे. 126 जागांच्या विधानसभेत 64 हा जादुई आकडा आहे. पण भाजपने हा आकडा पार करुन आता 82 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे. सध्याचा स्थिती पाहता भाजप आसाममध्ये पुन्हा सत्ता स्थापन करणार असा प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री सरबनंद सोनोवाल यांनी दिली आहे.

मोदी सरकारने कोरोना परिस्थिती हाताळण्यात केलेल्या चुका, ढासळलेली अर्थव्यवस्था, सत्तेत आल्यास सीएए रद्द करण्याची घोषणा या मुद्द्यांवर काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ही निवडणूक लढवली. पण आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचं दान टाकल्याचे या कलांवरुन दिसते आहे.

Tags:    

Similar News