महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात महायुती विरुद्ध शरद पवार असे थेट रयुद्ध रंगले होते. ८ जागा जिंकून आलेल्या शरद पवारांचे विधानसभा निवडणुकीत सुद्धा तगडे आव्हान महायुतीला असेल याचा अंदाज सर्वानाच आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या मध्यभागी शरद पवार उभे ठाकले आहेत. पवार गटाकडूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडण्यावरून टार्गेट केले जात आहे तर भाजप नेत्यांकडूनही पवारांना काउंटर केले जात आहे. याच मुद्द्यावर सोशल मीडियात सुद्धा ही लढाई चांगलीच रंगली आहे.