भाजपने सत्तेसाठी पवार कुटुंब तोडलं
सत्तेसाठी भाजपने आमच्या कुटुंबाला तोडल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.;
महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने आमचे कुटुंब तोडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. यावेळी बोलताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या २०२४ ला नाही तर येत्या डिसेंबरला होणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
जे राष्ट्रवादी मध्ये झालेलं आहे ते भाजपने कोणाच्या मित्रत्वासाठी केलेले नाही तर एक हाती सत्ता आणण्यासाठी भाजपने आमचे कुटुंब तोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.