पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पक्षाच्या सहा जणांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आय़ोगाकडे तक्रार दाखल केली. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पक्षातर्फे सांगण्यात आले आहे की नंदीग्राममध्ये आमच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला पण त्यात ते यशस्वी होऊ शकेले नाही. ज्या पद्तीने गेल्या काही दिवसात घटना घडत आहेत ते पाहता हा हल्ला म्हणजे नियोजित कट आहे, असे आम्हाला वाटते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. हल्ला झाला तेव्हा ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकही पोलीस तिथे नव्हता, असाही आरोप करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या दोन दिवस प्रचार दौऱ्यात होत्या. पण याच दरम्यान एका रॅलीमध्ये काही जणांनी आपल्य़ाला मागून ढकलले असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. पण आपण लवकरच बाहेर येऊन प्रचारात सहभागी होऊ असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.