बुलडाणा : राज्यातील ओबीसी समाजाचा विश्वास घात करून महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण घालविले असल्याचे म्हणत आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बुलढाणा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाला राज्यात लागु असलेले राजकीय आरक्षण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रद्द झाले. तरी आघाडी सरकारने तात्काळ ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून न्यायालयात योग्य ते पुरावे देत व बाजू मांडून पुन्हा राजकिय आरक्षण मिळवून दयावे व ओबीसी समाजाला न्याय दयावा अन्यथा बुलडाणा भारतीय जनता पार्टीच्या वतीने यापुढे यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला भाजपाच्या वतीने देण्यात आला.