Bird Flu: केरळमध्ये राज्य आपत्ती जाहीर, महाराष्ट्रात काय स्थिती आहे?

बर्ड फ्लू चं हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान आणि गुजरातमध्ये थैमान. महाराष्ट्रात काय आहे स्थिती? वाचा...;

Update: 2021-01-05 11:17 GMT

कोरोनाचं संकट संपत नाही तोच आता देशावर बर्ड फ्लूचं संकट आलं आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान आणि गुजरात (Himachal Pradesh, Rajasthan, Madhya Pradesh, Kerala, Gujarat) या राज्यांमध्ये पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. केरळमध्ये बर्ड फ्लू मुळे राज्य आपत्ती जाहीर केली आहे.

कोणत्या राज्यात किती पक्षांचा मृत्यू?

हिमाचल प्रदेश २३००

केरळ १२००

राजस्थान ५००

मध्य प्रदेश ३२०+

गुजरात ५५+

या मध्ये प्रामुख्याने बदक, कावळे, टिटहरी, बगळे या पक्षांचा समावेश आहे.

दरम्यान देशात ज्या भागांमध्ये बर्ड फ्लू मुळे पक्षी मरण पावत आहेत. त्याभागातील कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. चिकन आणि अंड्यावर बंदी घालण्यात आली आहे. मृत पक्षांवर योग्य़ रासायनिक पदार्थ टाकून जमिनीत पुरले जात आहे. तसंच जाळलं जात आहे. हिवाळ्या मध्ये अनेक पक्षी दुसऱ्या राष्ट्रामधून स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे बर्ड फ्लू आपल्या देशातील पक्षांना झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags:    

Similar News