ELON MUSK जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती...भारताचे अदानी-अंबानी कितव्या क्रमांकावर?

पुन्हा एकदा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये प्रमथ क्रमांकावर एलन मस्क (ELON MUSK) यांनी आपले नाव कोरले आहे. एलन मस्क यां्च्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर भारतातील अदानी-अंबानी या क्रमवारीवक कितव्या स्थानावर आहेत...ते नक्की वाचा...;

Update: 2023-02-28 11:01 GMT

जगातील अब्जाधीशांच्या यादीत आता मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासात झालेल्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे आतापर्यत नंबर वनवर असणारे फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अनॉल्ट ( BERNARD ARNAULT ) दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

एलन मस्क (ELON MUSK) यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ झाल्याची माहिती BIOOMBERG INDEX ने दिली आहे. या संपत्तीच्या वाढीमुळे मस्क यांनी बर्नार्ड यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून मस्क यांच्या संपत्तीमध्ये होणारी वाढ पाहता ते आगामी काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली होती.

जगातील टॉप १० अब्जाधीशांमध्ये २०२१ मध्ये एलन मस्क यांनी आपला क्रमांक एक वर ठेवला होता. मात्र २०२२ डिसेंबरमध्ये बर्नार्ड अनॉल्ट ( BERNARD ARNAULT ) यांनी मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रथम क्रमांक पटकावला होता. २०२२ हे वर्ष एलन मस्क (ELON MUSK) यांच्यासाठी सर्वाधिक संघर्षाचे ठरले होते. ४४ अब्ज डॉलरची ट्विटरसोबत करार झाल्यानंतर एलन मस्क यांची संपत्ती वर्षाच्या सुरवातीपासून घटण्यास सुरवात झाली होती. वर्षाच्या अखेरपर्यत ही घसरण सुरुच होती.

२०२२ मध्ये एलन मस्क हे जगात सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर होते. मात्र या वर्षाच्या सुरवातीलाच त्यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मान पटकावला आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षाच्या सुरवातीपासूनचं वाढ झाल्यामुळे एलन मस्क (ELON MUSK) यांच्या संपत्तीमध्ये ५०.१ अब्ज डॉलर वाढ नोंदवण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या बर्नार्ड अर्नॉस्टच्या ( BERNARD ARNAULT ) च्या संपत्तीमध्ये आतापर्यत २३.३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

एलन मस्क यांची कंपनी असलेल्या टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. टेस्लाच्या शेअरची किंमत शेवटच्या ट्रेडिंग दिवशी प्रती शेअर २०७.६३ डॉलरच्या पातळीवर पोहोचली. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये ५.४६ टक्के इतकी किंवा प्रति शेअर १०.७५ डॉलरने वाढ झाली आहे. ट्विटरसोबत डील सुरु झाल्यापासून त्यात मोठी घसरण झाली होती.

जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये मुकेश अंबानी ( MUKESH AMBANI ) हे टॉप-१० मध्ये आपले स्थान टिकवून आहेत. तर अदानी हे ३२ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेल्यामुळे गौतम अदानी ( GAUTAM ADANI ) यांच्या संपत्तीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रिलासन्सचे चेअरमन जगातील १० वे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्याची संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांत ६४६ मिलियन डॉलरची घट झाली आहे. ते सध्या ८१.१ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. तर लॅरी पेज ८४.७ अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे, तर कार्लोस स्लिम हेलू ८३.२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहेत. 

Tags:    

Similar News