Bihar Election: काँग्रेसमुळे तेजस्वीच्य़ा सुसाट गाडीला ब्रेक, शरद पवारांचा टोला
Bihar Election Sharad Pawar criticize on Tejaswi yadav after Congress given break;
तेजस्वी यादवला बिहार निवडणुकीत संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीपासून लांब राहिलो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रीय जनता दलाने जास्त जागा लढल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता, असंही शरद पवारांनी म्हटले आङे. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली. यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणार आहेत.
बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे खरं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.