नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने काय मिळवलं?
Bihar cm-oath-ceremony BJP Win win Position;
बिहार विधानसभा निवडणूकीत NDA ने बाजी मारल्यानंतर आज जनता दल यूनाइडेट (JDU) चे अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्यासोबत दोन मंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्री पद JDU ला दिलं असलं तरी भाजप दोन मंत्र्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देणार आहेत. यामध्ये तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे भाजपने विधानसभा अध्यक्ष पद देखील स्वत:कडे ठेवणार असल्याचं समजतं. तसंच महत्त्वाची खाती देखील भाजप स्वत:च्या पारड्यात टाकून घेणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार JDU च्या वतीनं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शिवाय विजेंद्र यादव, अशोक चौधरी, शीला मंडल आणि मेवालाल चौधरी शपथ घेऊ शकतात. भाजप च्या वतीनं मंगल पांडेय, जीवेश मिश्रा, रामप्रीत पासवान, अमरेन्द्र प्रताप सिंह आणि रामसूरत राय शपथ घेणार आहेत.
साधारण पणे आज 15 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दोन उप मुख्यमंत्री यांच्यासह JDU आणि BJP चे प्रत्येकी पाच-पाच मंत्री शपथ घेणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत अंतिम निकाल पाहिले असता तेजस्वी यादव यांच्या लाल टेन ने भाजप आणि जेडीयूला आव्हान देत निकालाची चुरस मोठ्या प्रमाणात वाढवली खरी मात्र, अंतिम सामन्यात NDA ने बाजी मारली. मात्र, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक 75 जागा मिळवत बिहार निवडणूकीत एक नंबर चा पक्ष ठरला. तर 74 जागा मिळवत भाजप ने बिहारमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.
एनडीए ने नितिश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं. 125 जागा मिळवत एनडीएने पुन्हा एकदा बिहार मध्ये सत्ता मिळवली.