Corona Update : देशात कोरोनाचा हाहाकार, 24 तासात रुग्णसंख्या दीड लाखांपार, 327 मृत्यू
देशात कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरूच आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपुर्वी कोरोना रुग्णसंख्येने 1 लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.;
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या 24 तासात 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 327 रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच 24 तासात 40 हजार 863 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
देशात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. आतापर्यंत देशात 3 हजार 623 नव्या ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यामध्ये महाराष्ट्र 1 हजार 9 रुग्णांसह देशात सर्वोच्च स्थानी कायम आहे. त्यापैकी 1 हजार 409 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. तर 513 ओमायक्रॉन रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यापैकी 439 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. तसेच गेल्या 24 तासात राज्यात 133 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.
नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर देशात दररोजचा रुग्णवाढीचा दर 10.21 टक्क्यांवर पोहचला आहे. तर सध्या देशात 5 लाख 90 हजार 611 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांची संख्या 151 कोटी 58 लाखांवर पोहचली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर होणारी रुग्णांची वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध जारी केले आहेत