धाकधूक वाढली, देशाची कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या घरात
गेल्या काही दिवसात कोरोनाचा (Corona) धुमाकूळ सुरूच आहे. तर मंगळवारी मंदावलेली रुग्णसंख्या बुधवारी 2 लाखांच्या घरात पोहचली आहे. गेल्या 24 तासा कोरोना रुग्णांच्या संख्येत 1 लाख 94 हजार 720 वाढ झाली आहे. तर ही 27 मे 2021 नंतर झालेली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron variant) च्या पार्श्वभुमीवर देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन 4 हजार 868 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या 60 हजार 405 इतकी आहे. तर 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात एकूण कोरोना रुग्णांची (Covid-19 case in india) संख्या 3 कोटी 60 लाख 70 हजार 510 इतकी झाली आहे. तर सध्या 9 लाख 55 हजार 319 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र आतापर्यंत 3 कोटी 46 लाख 30 हजार 536 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
देशात नागरीकांना 153 कोटी 80 लाख 8 हजार 200 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 26 हजार 657 जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह कोरोना रुग्णवाढीचा दर 11.5 टक्क्यांवर पोहचला आहे, त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र गेल्या 24 तासात 34 हजार 424 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत 11 हजार रुग्ण आढळून आले आहेत.