वीज ग्राहकांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

गेल्या दोन्ही अधिवेशनात वीज बील आणि कनेक्शन तोडणीवरून मोठा गदारोळ झाला होता. तर येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातही वीज बीलाचा मुद्दा तापण्याची शक्यता होती. त्यापार्श्वभुमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांसाटी मोठी घोषणा केली आहे.

Update: 2022-03-01 11:56 GMT

पावसाळी व हिवाळी अधिवेशनात वीज बीलाचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातही हा मुद्दा तापण्याची शक्यता होती. मात्र त्यापुर्वीच उर्जामंत्री नितीन राऊत दोन दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर असताना त्यांनी एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या लोणार येथून बोलत होते. यावेळी उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, उच्चदाब वीज ग्राहकांनी एक रकमी वीज बील भरल्यास त्यांना 5 टक्के तर लघुदाब वीद ग्राहकांनी एक रकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये शेतीपंपांना कुठलाही दिलासा देण्यात आला नाही. तर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने राज्यात अभय योजना लागू करण्यात येणार असल्याचेही यावेळी नितीन राऊत यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांसाठी नेमकं काय ?

गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगाम सुरू असतानाही शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे पिकं करपून जात आहेत. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये महावितरण विरोधात प्रचंड असंतोष आहे. तर त्याचाच उद्रेक सांगली जिल्ह्यातील कासबेदिग्रज येथील महावितरणला शेतकऱ्यांनी आग लावली. तर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी साप सोडले होते. मात्र तरीही उर्जामंत्र्यांनी केलेल्या घोषणेत शेतकऱ्यांसाठी काहीही तरतूद नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुर आणि सांगली येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्याची दखल प्रशासन किंवा शासनाने घेतली नही. त्यापार्श्वभुमीवर उर्जामंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. मात्र त्या घोषणेत शेतकऱ्यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना आहे.


Tags:    

Similar News