जागतिक महिला दिना मांडल्या गेलेल्या राज्यातच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेनुसार राज्यात कुठेही घर खरेदी केले आणि त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर जर त्या घराची खरेदी केली गेली तर मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास
त्याचबरोबर राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिंनींना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त १ हजार बसेसची सोय केली जाणार आहे. मोठ्या शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी विशेष बसेसची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. नवतेजस्विनी महिला ग्रामीण उद्यम विकास योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणसाठी ३०० कोटींचा निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध केला जाईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
घर कामगार महिलांसाठी योजना
कोरोना संकटाच्या काळात असंघिटत क्षेत्रात मोडणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना मोठा फटका बसला. भविष्यात अशी परिस्थिती आल्यास त्यांना आधार देता यावा यासाठी त्यांची नोंदणी करुन मदतीसाठी संत जनाबाई सामाजिक कल्याण योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली. यातर सरकारतर्फे २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे जमा होणाऱ्या निधीमधून घरकाम कऱणाऱ्या महिलांसाठी योजना राबवण्यात येतील असेही अजित पवार यांनी सांगितले. तर महिला आणि बालविकास विभागाकरीता पुडील आर्थिक वर्षासाठी ३ हजार ६६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.