भीमा कोरेगाव आरोपींच्या पत्रात आक्षेपार्ह मजकूर असल्यानेच पत्रं रोखली : NIA

Update: 2021-10-10 07:40 GMT

Unlawful activities (prevention) act (UAPA) अर्थात बेकायदा कारवाई विरोधी कायद्या अंतर्गत अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे आणि वर्नान गोनसाल्वीस यांनी त्यांच्या कुंटुबियांना पाठवलेली पत्र तळोजा कारागृह अधिक्षकांनी रोखल्या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

आनंद तेलतुंबडे आणि वर्नान गोनसाल्वीस यांच्या पत्नींनी मुंबई उच्च न्यायालयात तळोजा कारागृह अधिक्षकांविरोधात याचिका दाखल केली आहे. आरोपीनी त्यांच्या कुटुंबियांसाठी लिहलेली पत्र अडवून ठेवल्याचा याचिकाकर्त्यांना आरोप आहे. पत्रं कुटुंबियांपर्यंत पोचू न देणे म्हणजे तुरुगांत असलेल्या आरोपींना देण्यात आलेल्या मुलभुत अधिकारांचा भंग असल्याचे याचिकेत म्हणण्यात आले आहे.

एनआयएच्या वतीने अॅड.संदेश पाटील यांनी पत्रातमधे आक्षेपार्ह (objectional material)असल्याचे सांगितले. सदर पत्रातील मजकुराचा लेख करुन तो कारवान मासिकामधे छापल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर न्यायमुर्ती नितीन जमादार आणि एसवी कोतवाल यांनी एनआयएला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत दोन आठवड्यानंतर सुनावणीचे आदेश दिले आहेत.

आरोपीची पत्र कुटुंबियांना पाठविण्याबाबत कधीही बंधन टाकण्यात आले नव्हते. नक्षली कारवायांमधे सहभागी असल्याच्या आरोप या आरोपींवर आहे. उच्च न्यायालयाने सहआरोपी महेश राऊत यांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यावर एनआयए कोर्टाच्या निर्णयावर देखील उत्तर मागितले आहे.

Tags:    

Similar News