पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने फेकली शाई

Update: 2023-10-16 03:04 GMT

 सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असता,भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला. यावेळी खाजगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीसांचा मोठा बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैदर्गीकर याने शाई फेखली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटलांना सोलापुरातून विरोध सुरू होता. त्या पाश्र्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात केला होता. शासकीय विश्रामगृहाला येथे छावणीचे स्वरूप आले होते. खुद्द पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.मोठी सुरक्षा भिंत तोडुन भीम आर्मीच्या अजय मैदर्गीकर याने शाई फेकली. चंद्रकांत पाटलांचा पांढऱ्या शर्टवर शाई फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांनी ताबडतोब अजयला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या हातात काळे झेंडे होते.

चंद्रकांत पाटलांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेखर बंगाळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं

धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे आले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने स्वतः तळ ठोकून बसले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा शासकीय विश्रामगृह येथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी व झाडाझडती करत आहे.धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर निवेदन देण्याचा बहाणा करून भंडारा उधळला होता. त्यामुळे सावध भूमिका बाळगत सोलापूर पोलिसांनी शेखर बंगाळे व त्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.शेखर बंगाळे व त्याचे कार्यकर्ते पोलिसांना समजून सांगत होते,परंतु सोलापूर पोलिसांनी काहीही न ऐकता,चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृह येथे येण्या अगोदर शेखरला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले.

चंद्रकांत पाटलांच्या आगमना अगोदर पोलिसांची कडक तपासणी मोहीम; मोजक्या जणांनाच दिला जात होता प्रवेश

सोलापूरचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भंडारा उधळला होता. या प्रकरणानंतर सोलापूर शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी सोलापूर पोलिसांनी घेतली आहे.सोलापूर शहर पोलीसांनी सुरक्षेच्या कारणास्तव काही मोजक्याच कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश दिला.प्रवेश देताना प्रत्येकाचे खिसे-रुमाल झटकून तपासण्यात आले अन् प्रवेश दिला. भाजपमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत पोलिसांशी शाब्दीक चकमक उडत होती,आणि खटके उडत होते.शासकीय विश्रामगृहाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा पोलीस फौजफाटा शासकीय विश्रांमगृहात तैनात करण्यात आला आहे.

Similar News