Bheema koregoan : सरकारने बार्टीचा निधी शौर्यदिनाकरीता वापरू नये- आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रमाकरीता बार्टीच्या निधीचा वापर न करता इतर सरकारी निधीचा वापर करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना केली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्याशी इतरही महत्वपूर्ण मुद्द्यांवर Exclusive बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....;
महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रमाकरीता बार्टीच्या निधीचा वापर न करता इतर सरकारी निधीचा वापर करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा निधी या कार्यक्रमासाठी वापरल्याने व शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती वापरण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. कोणत्याही परिस्थितीत या निधीचा वापर न करता इतर सरकारी निधी या कार्यक्रमासाठी वापरावा या मागणीसाठी शालेय शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असल्याचेही आनंजराज आंबेडकर यांनी सांगितले.