भारत जोडो यात्रेची पुढील सभा १९ एकर शेतात; काँग्रेस नेत्यांच्याकडून सभेची जय्यत तयारी.
राहुल गांधी यांची शेगावातील पुढील सभा १९ एकर शेतजमीनवर होणार आहे. ही सभा सर्वात महत्त्वाची ठरावी यासाठी जय्यत तयारी सरु असून, काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.;
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर राहुल गांधीच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायाला मिळते, महाराष्ट्रातील राहुल गांधी यांच्या दोन सभेला लोकांची गर्दी पाहिल्यानंतर, शेगावात १८ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची सभा होणार आहे. होणाऱ्या सभेला लोकांची गर्दी पाहून काँग्रेस नेत्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढील सभेसाठी जय्यत तयारी सुरु केली.राहुल गांधी यांची शेगावातील पुढील सभा १९ एकर शेतजमीनवर होणार असल्याने, या ठिकाणी अडीच लाख लोकांची उपस्थित राहण्याची क्षमता आहे.
पुढील जागेत लाखांच्या आसपास लोक उभे राहून ही सभा ऐकू शकतात. तसेच राहुल गांधी यांच्या सभेला मुंबई आणि इंदौरहून खुर्च्या मागव्यात आल्याने लोकांना बसल्या जागीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या मैदानावरती अकरा प्रवेशदार असणार आहेत. या प्रवेशदाराजवळ नियोजीत पासानुसार लोकांना प्रवेश दिला जाईल. तसेच लोकांच्या वाहनांची व्यवस्था एक किलोमीटर अंतरावर करण्यात आल्याने व्यासपिठापासून ६५ फूट एलईडी टिव्ही बसवण्यात आली आहे.
सभेसाठी प्रसाधान गृहे देखील असणार आहेत.पहिल्या रांगेत महत्त्वाची व्यक्ती आणि प्रसारमाध्यमांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. ही सभा सर्वात महत्त्वाची ठरावी यासाठी जय्यत तयारी सरु असून, काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे